शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या मदतीसाठी तालुकास्तरावर सुरक्षा अधिकारी

By admin | Updated: January 20, 2015 23:19 IST

बुलडाणा जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी तालुकास्तरावरील उपाययोजना.

बुलडाणा : घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पिडित महिलांच्या मदतीसाठी आता राज्यभरात ३६१ तालुक्यांमध्ये २१६ पूर्ण वेळ सुरक्षा अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणार असून यामुळे घरगुती महिलांना सुरक्षेचे कवच प्राप्त होणार आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणात महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा केला आहे.मात्र महिलांवर होणा-या अत्याचारात दिवसागणिक वाढ होत आहे.विवाहित महिलांचा हुंड्यासाठी सासरची मंडळी मानसिक किंवा शारीरिक छळ करीत आहेत. त्यात धमकविणे, जाळून मारणे, माहेरी पाठविणे, घरात कोंडून ठेवणे, मानसिक त्रास देणे असे प्रकार अद्यापही सुरु आहे. या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात आल्यावर राजेंद्र अनभुले यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायाधीश अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकेवरील सुनावणी करण्यात आली. त्यानुसार सहा महिन्यांत महिलांसाठी सुरक्षा अधिकारी नेमावेत असा आदेश खंडपीठाने एप्रिल २0१४ मध्ये दिला होता. या आदेशानंतर टप्प्या-टप्प्यात राज्यभरात तालुकास्तरावर सुरक्षा अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कौटूंबिक हिंसाचाराबाबत महिलांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी दोन वर्षापूर्वी जिल्हापातळीवर विधी सल्लागार व संरक्षण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी आता तालुकास्तरावर सुरक्षा अधिकारी देण्यात येणार असल्याचे जिल्हा विधीसल्लागार पी.जे.सोनकांबळे यांनी स्पष्ट केले.