शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात

By admin | Updated: April 14, 2017 00:28 IST

सिंदखेडराजा येथून सुरुवात: दोन हजारावर शेतकरी मोटारसायकलने सभेस राहणार उपस्थित- आ.बोंद्रे

चिखली : शेतकऱ्यांना न्याय देणारा स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी शासनाकडून होणारी दिरंगाई, शेती क्षेत्रातील विविध समस्या वाढलेल्या असताना व मागिल तीन वर्षे दुष्काळी स्थितीने शेतकरी पिचलेला असताना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी शासनाकडून होणारी चालढकल, या प्रश्नावर केल्या जाणारा शब्दच्छल आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर राजकारण या विरोधात पहिल्या टप्प्यातील १६ जिल्ह्यांचा २५०० किलोमीटर अंतराच्या संघर्ष यात्रेनंतर दुसरा टप्प्यातील संघर्ष यात्रेस १५ एप्रिलपासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महराज यांचे आजोळ, राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून प्रारंभ होणार आहे़ या संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन चिखलीचे आमदार राहुल बोंदे्र यांनी केले आहे.यात्रा सिंदखेडराजा येथून सुरू होऊन बुलडाणा जिल्हा, जळगाव खान्देश, धुळे शिरपूर, नंदुरबार, मालेगाव, नाशिक मार्गे शहापूर येथे सभा घेऊन ठाणेपर्यंत जाणार आहे़ या संघर्ष यात्रेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष, एमआयएम या पक्षासह शेतकरी संघटनेचाही सहभाग राहणार आहे़ दरम्यान, सिंदखेडराजा व बुलडाणा येथे सभा आयोजित करण्यात आल्या असून, या सभेसाठी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राजीव सातव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, राष्ट्रवादी कॉगे्रसचे नेते अजित पवार,, सुनिल तटकरे, समाजवादी पक्षाचे अबु आजमी, रिपब्लिकन पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे, जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यस्तरीय नेते व सहभागी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सिंदखेडराजा येथील सभेनंतर प्रारंभ होणारी ही संघर्ष यात्रा चिखलीकडे प्रयाण करेल, चिखली येथून बुलडाणा जाताना या यात्रेत चिखली तालुक्यातील दोन हजारावर शेतकरी, कामगार मोटारसायकलने यात्रेबरोबर सभेसाठी बुलडाण्याकडे रॅलीने जाणार आहेत. दरम्यान, बुलडाणा येथील सभा संपल्यावर संघर्ष यात्रा मुक्ताईनगरकडे प्रयाण करणार आहे.