संजय कुटे म्हणतात नाराज नाही पण....! दीर्घ पत्रातून व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:08 IST2024-12-17T10:08:03+5:302024-12-17T10:08:43+5:30
त्यांनी स्वतः सह पक्ष व त्यांना मंत्रिपदाबाबत असलेल्या अपेक्षा, कार्यकर्त्यांच्या भावनांचा उहापोह केला आहे, तसेच आगामी भूमिकाही मांडली आहे.

संजय कुटे म्हणतात नाराज नाही पण....! दीर्घ पत्रातून व्यक्त केली भावना
लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : 'पक्षाने दिलेल्या भूमिका प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण क्षमता आणि शक्ती पक्षासाठी वापरली. तरीही पक्षाच्या अपेक्षा किंवा जे हवे होते ते देऊ शकलो नसेन, कदाचित कमी पडलो, कूटनीती कधी जमली नाही, स्वभावात आणि संस्कारात कूटनीती कुठेही नाही, त्यामुळे कदाचित या प्रवाहात मला बाजूला राहण्याचा प्रसंग आला आहे', अशा 'शब्दात माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या आहेत.
सोमवारी दुपारी १२:१४ वाजता त्यांनी समाज माध्यमांवर दिर्घ पोस्ट व्हायरल केली. त्यामध्ये त्यांनी स्वतः सह पक्ष व त्यांना मंत्रिपदाबाबत असलेल्या अपेक्षा, कार्यकर्त्यांच्या भावनांचा उहापोह केला आहे, तसेच आगामी भूमिकाही मांडली आहे.
माध्यमावर टोले..
डॉ. कुटे यांच्या पोस्टवर अनेकांनी समर्थन केले. तकाहींनी टोलेबाजी केली. नाराज नसता तर एवढे लिहिले नसते. त्यासाठी समाजमाध्यमावर एवढा पत्रप्रपंच का, असा प्रश्न काहींनी विचारला. जिल्ह्यातून तुम्हीच प्रबळ दावेदार होते. जे झाले ते अनपेक्षित होते असे एका युजरने म्हटले.