अज्ञात वाहनाच्या धडकेत संजय देशमुख गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:19 AM2018-02-07T00:19:23+5:302018-02-07T00:19:54+5:30

राहेरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत लोकमतचे दुसरबीड येथील वार्ताहर संजय देशमुख गंभीर जखमी झाल्याची घटना ५  फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दुसरबीड ते बिबी मार्गावरील नगरमाळ शिवारात घडली. जखमीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे.

Sanjay Deshmukh most injured | अज्ञात वाहनाच्या धडकेत संजय देशमुख गंभीर 

अज्ञात वाहनाच्या धडकेत संजय देशमुख गंभीर 

Next
ठळक मुद्देआर्थिक मदतीसाठी ओमप्रकाश शेटे यांचे प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्क
राहेरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत लोकमतचे दुसरबीड येथील वार्ताहर संजय देशमुख गंभीर जखमी झाल्याची घटना ५  फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दुसरबीड ते बिबी मार्गावरील नगरमाळ शिवारात घडली. जखमीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे.
दुसरबीड येथील वार्ताहर संजय विठ्ठलराव देशमुख (वय ४0) हे मोटारसायकलने बिबीवरून दुसरबीड येथे परत येत होते.  नगरमाळ शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये संजय देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, जऊळका येथील बालू मुंढे या युवकाने रामदास नागरे, भारत चेपटे, प्रताप सानप यांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या संजय देशमुख यांना तत्काळ दुसरबीड येथील डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये हलविले; परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने संजय देशमुख यांना विजय देशमुख व पत्रकार रमेश कोंडाणे, शेख समद शेख अमजद, नीलेश जाधव आदींनी तातडीने औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले.  

आर्थिक मदतीसाठी ओमप्रकाश शेटे यांचे प्रयत्न 
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी असलेले ओमप्रकाश शेटे यांना संजय देशमुख यांच्या अपघातामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज असल्याची माहिती रामेश्‍वर काळुसे यांनी दिली. दरम्यान, ओमप्रकाश शेटे यांनी कागदपत्रे जमा होताच मुख्यमंत्री आरोग्य निधीतून तातडीने मदत देण्याचे आश्‍वासन दिले.
 

Web Title: Sanjay Deshmukh most injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.