लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: महाराष्ट्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा मोहिमें तर्गत एनएफएसए प्रमाणिक बियाणे वाटप घटकांतर्गत महाबीज वितरण पुरवठामार्फत शेतकर्यांना अनुदानावर हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले; मात्र या बियाण्यांची बाजारभावा पेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत आहे. डोणगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेंतर्गत हरभरा बियाणे ६0 क्विंटलने डोणगाव येथे शेतकर्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यासाठी शेतकर्याला कृषी सहायकाजवळ ८ (अ), आधारकार्डाची झेरॉक्स द्यावी लागणार असून, शेतकर्याला प्रती हेक्टर कमाल तीन हरभरा बॅग (९0 किलो) बियाणे मिळणार आहेत; परंतु सध्या बाजारात हरभरा बियाणे ५0-५५ रुपये किलो दराने मिळत आहे व शासनाचे अनुदानावर ६५ रुपये किलो हरभरा बियाणे मिळत असल्याने शासन हे शेतकर्यांची थट्टा करून अनुदानाच्या नावाखाली जादा दराने बियाणे विकत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन जास्त भावात विक्री करणार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
अनुदानित हरभरा बियाण्याची जादा दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:14 IST
डोणगाव: महाराष्ट्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा मोहिमें तर्गत एनएफएसए प्रमाणिक बियाणे वाटप घटकांतर्गत महाबीज वितरण पुरवठामार्फत शेतकर्यांना अनुदानावर हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले; मात्र या बियाण्यांची बाजारभावा पेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत आहे.
अनुदानित हरभरा बियाण्याची जादा दराने विक्री
ठळक मुद्देअन्नसुरक्षा मोहिमेंतर्गत एनएफएसए प्रमाणिक बियाणे वाटपमहाबीज वितरण पुरवठामार्फत शेतकर्यांना अनुदानावर हरभरा बियाणे