संशयास्पद खते, कीटकनाशकांची विक्री; पहुरजिरा येथे जळगाव जिल्ह्यातील आरोपीला पकडले
By सदानंद सिरसाट | Updated: August 29, 2023 16:34 IST2023-08-29T16:32:54+5:302023-08-29T16:34:04+5:30
शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे आरोपी खते आणि कीटकनाशकांची संशयास्पद विक्री करीत असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी रवीकिरण नावकर यांना मिळाली.

संशयास्पद खते, कीटकनाशकांची विक्री; पहुरजिरा येथे जळगाव जिल्ह्यातील आरोपीला पकडले
खामगाव : शेगाव तालुक्यात खते, कीटकनाशक विक्रीचा परवाना नसताना पहुरजिरा येथे संशयास्पदरीत्या या वस्तूंची विक्री करताना एकाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पकडले, त्याच्याविरूद्ध जलंब पोलिसात तक्रार केल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल करत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बु, येथील आरोपी जितेंद्र अभिमान तायडे याला मंगळवारी पहाटे अटक केली.
शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे आरोपी खते आणि कीटकनाशकांची संशयास्पद विक्री करीत असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी रवीकिरण नावकर यांना मिळाली. त्यांनी त्याठिकाणी धाव घेत आरोपींकडे असलेली खते, कीटकनाशके संशयास्पद असल्याचे आढळून आले. यावेळी खते व कीटकनाशके मिळून १ लाख ८४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल तसेच चारचाकी वाहन क्रमांक एमएच-०२, एक्यू-१८३५ जप्त केले. आरोपीवर खत नियंत्रण आदेश १९८५ खंड ५७, १९(सी)३, १९६२ व कीटकनाशक कायदा १९६८, १३(१), १८(बी), भादंविच्या कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पाहेकाॅ पोहेकर करीत आहेत.