भरधाव ऑटाे उलटला, एकजण ठार; सोनाटी नजिक अपघात : दाेन जण जखमी
By संदीप वानखेडे | Updated: September 24, 2023 20:15 IST2023-09-24T20:14:58+5:302023-09-24T20:15:16+5:30
मेहकर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ऑटाे उलटल्याने एकजण जागीच ठार झाला, तर दाेन जण जखमी झाले. ही घटना ...

भरधाव ऑटाे उलटला, एकजण ठार; सोनाटी नजिक अपघात : दाेन जण जखमी
मेहकर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ऑटाे उलटल्याने एकजण जागीच ठार झाला, तर दाेन जण जखमी झाले. ही घटना साेनाटी गावाजवळ २४ सप्टेंबर राेजी सायंकाळी घडली. नितीन आश्रू गव्हाणे (वय ३०, रा. अकाेला ठाकरे) असे मृतकाचे नाव आहे.
सोनाटीकडून मेहकरकडे वेगाने येत असलेला ऑटो (क्रमांक एमएच ३७-जी ४५२७) वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. यामध्ये नितीन आश्रू गव्हाणे हे जागीच ठार झाले, तर दोन जण जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जखमींना सुटी देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच मेहकर पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. तसेच प्रेत उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पुढील तपास मेहकर पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल जायभाये करीत आहेत.