बुलढाण्यात अद्रक पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:35 IST2023-10-26T15:34:38+5:302023-10-26T15:35:12+5:30
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सोयाबीन पिकाला यलो मोझॅक, मूळकुज, खोडकुजीचा मोठा फटका बसला आहे.

बुलढाण्यात अद्रक पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी अडचणीत
येलो मोझॅकने सोयाबीन पीक हातचे गेल्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील अद्रक उत्पादक शेतकरी विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी अद्रक पिकाची लागवड केली आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सोयाबीन पिकाला यलो मोझॅक, मूळकुज, खोडकुजीचा मोठा फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीनवर तर 'यलो मोझॅक' हा विषाणूजन्य रोग आणि 'खोडकुज', 'मुळकुज' या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट येत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचवेळी लागवड, कीटकनाशके फवारणी आणि निंदनासाठी शेतकर्यांनी जवळपास एकरी १ लाख रुपयांचा खर्च केला आहे.
नांद्राकोळी येथील बालू हुडेकर या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात तीन एकरामध्ये अद्रकचे पीक घेतले आहे. या तीन एकरामध्ये जवळपास अडीच ते तीन लाख रुपये खर्च त्यांनी केला आहे. मात्र, अद्रक पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.