दरोड्यातील अट्टल गुन्हेगारास भुसावळ येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:09 IST2019-07-17T14:09:19+5:302019-07-17T14:09:24+5:30

भुसावळ येथील अक्षय रतन सोनोने (वय २५) रा. भुसावळ याला नांदुरा पोलिसांनी १६ जुलै रोजी भुसावळ येथून अटक केली आहे.

The robers was arrested from Bhusawal | दरोड्यातील अट्टल गुन्हेगारास भुसावळ येथून अटक

दरोड्यातील अट्टल गुन्हेगारास भुसावळ येथून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क 
नांदुरा: तीन महिन्यांपूर्वी एका तरुणास रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याच्या जवळील सोन्याची अंगठी व सोन्याची चैन आदी मौल्यवान वस्तू लंपास करणाºया भुसावळ येथील अक्षय रतन सोनोने (वय २५) रा. भुसावळ याला नांदुरा पोलिसांनी १६ जुलै रोजी भुसावळ येथून अटक केली आहे. आरोपी  अक्षय रतन सोनोने यास तीन महिन्यांपूर्वी त्याच्या तीन साथीदारांसह नांदुरा शहरातील मोठ्या हनुमान मुर्ती जवळ राहणाºया सौरभ देशमुख या तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोन्याची चेन व अंगठी लंपास केली होती. यामधील अन्य तीन आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र भुसावळ  येथील आरोपी अक्षय रतन सोनोने  हा पोलिसांना सतत हुलकावण्या देत होता. अखेर नांदुरा पोलिसांनी त्याला १६ जुलै रोजी भुसावळ येथून अटक केली आहे.   

 
वाडीत दोन गटात हाणामारी

खामगाव: येथील वाडी भागात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १६ जुलैरोजी रात्री १० वाजता घडली. क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने वाडीत तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: The robers was arrested from Bhusawal