शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ज्येष्ठ नागरिकांमध्ये ‘फायब्रोसिस’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:04 IST

Khamgaon News पोस्ट कोविड सेंटरमध्ये दररोज ३ ते ५ रुग्ण अशा या तक्रारींना घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : देशात झपाट्याने वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावानंतर सध्या बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र याचा अर्थ कोरोना संपेल असा नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशात लाखोंच्या संख्येत बाधित आढळले असताना कोरोनाने लाखो लोकांचा जीवही घेतला आहे. खामगाव तालुक्याची स्थिती बघितल्यास तालुक्यातील बाधितांची आकडेवारी दोन हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. यात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ५६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण खामगाव तालुक्यात आहेत, तर  १८०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोनावर मात केल्याचा अर्थ अस नाही की, रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही कित्येक रुग्णांना त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठांची संख्या जास्त असून, त्यांना श्वास घेण्यास त्रास, वारंवार दम लागणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा अशा समस्या दिसून येत आहेत. फुफ्फुसांच्या या समस्येला  फायब्रोसिस म्हटले जाते. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर व दवाखान्यातून सुटी झाल्यानंतर धोका टळला असे नाही. उलट अशा तक्रारी वाढत असल्याने घरी आल्यानंतर अधिकच काळजी वाढत आहे. येथील पोस्ट कोविड सेंटरमध्ये दररोज ३ ते ५ रुग्ण अशा या तक्रारींना घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. त्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे डॉ. नीलेश टापरे यांनी सांगितले.

बरे झालेल्यांनाही आरोग्याच्या तक्रारी !कोरोनातून बरे झाल्यानंतरही येथील सामान्य रुग्णालयात अशाच तक्रारींना घेऊन येत आहेत. अशात त्यांना आता घरी असताना काय काळजी व औषध घ्यावे हे सांगितले जात आहे. त्यांना औषध, फिजियोथेरपी आदी दिली जात असून, घरी काय-काय करावे हेही समजाविले जाते आहे. अशात आता त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे.

कोरोनाने गरीब, श्रीमंत, ज्येष्ठ व युवा असे कुठलेच बंधन पाळलेले नाही. हा जीवघेणा आजार असून, खास करून युवावर्गाने त्याला गमतीत घेऊ नये, कोरोनामुळे ज्येष्ठांसोबतच युवांचाही किमती जीव गेला आहे. त्यामुळे उपाययोजनांचे पालन करावे.- डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या