शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कमी किमतीत सोन्याची नाणी देण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त पोलिसाला १२ लाखांचा गंडा, मारहाणही केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 21:15 IST

नकली सोन्याची नाणी, मांडूळ साप आणि काळी जादू करण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळ्या खामगाव तालुक्यातील अंत्रज परिसरात आहेत. आता या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे शुक्रवारच्या घटनेवरून समोर येत आहे.

 खामगाव - कमी किमतीत नाणी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीने पुन्हा डोकेवर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कमी किमतीत सोन्याची नाणी देण्याचे आमिष देत एका सेवानिवृत्त पोलीस आणि त्याच्या साथीदाराची १२ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका संशयित आरोपीस शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

नकली सोन्याची नाणी, मांडूळ साप आणि काळी जादू करण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळ्या खामगाव तालुक्यातील अंत्रज परिसरात आहेत. आता या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे शुक्रवारच्या घटनेवरून समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी राजेंद्र चंदुलाल जाधव (६० ) यांना खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष देत चिखली रोडवरील निरोड फाट्यावर बोलावण्यात आले. सौदा पक्का झाल्यानंतर राजेंद्र जाधव आपल्या तीन साथीदारांना घेऊन निरोड फाट्यावर पोहोचले. त्यावेळी या फाट्यावर आधीच दडून बसलेल्या १० ते १२ अज्ञात इसमांनी जाधव आणि त्यांच्या साथीदारांवर हल्ला चढवला. चाकूचा धाक दाखवून जाधव यांच्याकडील पाच लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याची चेन, अंगठी, मोबाई, घड्याळ आणि इतर साहित्यासह ११ लक्ष ६६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. 

याप्रकरणी राजेंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून अनिल छन्नु भोसले, अभिसेन तोन भोसले, दीपक भीमराव चव्हाण, दिनकर चलबाबू भोसले आणि इतर ८ जणांविरोधात भादंवि कलम ३९४, ३९५, १२० ब भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरमन सुजातसिंग मर्दानसिंग पवार (४६, मुक्ताईनगर) याला एका प्रवासी कारसह अटक करण्यात आली आहे.

टोळीने काढले डोके वर! -- मध्यंतरी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात या टोळीचा बीमोड करण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते. सिनेस्टाईल ऑपरेशन राबवून खामगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. त्यानंतर काही टोळींचे म्होरके भूमिगत झाले होते. आता कारवाई शिथिल होताच टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. नकली नाणी, कमी किमती वाहन, आजारपण आणि लहान मुलांच्या खेळणी विक्रीतून लोकांशी सलगी वाढवित त्यांची फसवणूक करण्याचा या टोळीचा फंडा आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRobberyचोरी