शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

‘एनआरसी’, ‘सीएए’च्या विरोधात बुलडाण्यात तिरंगा यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 2:36 PM

६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन इंदिरा नगर येथून करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर बुलडाण्यातही शाहीन बाग याच नावाने कुल जमाती तंझीमच्या नेतृत्वात साखळी उपोषणाची सुरू आहे. उपोषणाच्या १३ व्या दिवशी २६ जानेवारी रोजी बुलडाण्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली.या तिरंगा यात्रेत हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात शाहिनबाग या नावाने साखळी उपोषणाची सुरूवात १७ जानेवारी पासून करण्यात आली आहे. दरम्यान, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन इंदिरा नगर येथून करण्यात आले. जवळपास १०० मिटर लांबीच्या तिरंग्याखाली हजारों समाज बांधवांच्या उपस्थितीत जोरदार घोषणेच्या जयघोषाने तिरंगा यात्रा इंदिरानगर येथून निघाली. नंतर संगम चौक, बस स्थानमार्गे जयस्तंभ चौक येथे पोहचल्यावर शाहीनबागच्या समोरील यात्रेचे रूपांतर एका जनसभेत झाले. यावेळी कुल जमाती तंझीमच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, आपली लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात आहे.आपल्या उपोषणामुळे कोणत्याही धर्माच्या नागरिकांना त्रास होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन कुल जमाती तंझीमच्या वतीने करण्यात आले.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी