शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दगा; उत्पादन घटले

By admin | Updated: October 18, 2014 23:58 IST

संग्रामपूर तालुक्यातील चित्र, सोयाबीन, कपाशी धोक्यात.

संग्रामपूर (बुलडाणा): परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीनचे दाणे बारीक झाले, तर कोरडवाहू कपाशी धोक्यात आली आहे. दिवाळीच्या सणासह वर्षभराचा आर्थिक गाडा कसा चालवावा, याची चिंता तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांसमोर उभी ठाकली आहे.यंदाच्या हंगामात सुरवातीलाच पेरणीचा ताळमेळ हुकल्याने दोन ते तीन वेळा पेरणी करण्याची वेळ आली. यामध्ये बियाण्यासह मजुरीवर आलेला खर्च पाहता, कमीत कमी सोयाबीनची एकरी आठ ते दहा क्विंटलच्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, परतीचा पाऊस कोसळला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पक्व होण्याआधीच सुकल्या व दाणे बारीक राहिले. सद्य:स्थितीत एकरी दीड क्विंटलपासून तर चार-पाच क्विंटलपर्यंंत उत्पादनाचे आकडे येत आहेत. सोंगणीचा एकरी हजार व थ्रेशरचे एकरी हजार असा दोन हजार रुपये, शिवाय आतापर्यंतचा खर्च लक्षात घेता, सोयाबीन कोणत्याच भावात परवडणारे झाले आहे. अशातच सोयाबीनला बाजारात क्विंटलमागे अडीच हजार ते तीन हजार रुपये असलेला भाव शेतकर्‍यांसाठी मारक आहे. पाऊसच नसल्याने तुरीचे पीकही धोक्यात आले आहे. सोयाबीनमध्ये हुकले तरी तुरीमध्ये जमेल, ही आशाही मावळताना दिसत आहे. यासोबतच कोरडवाहू कपाशीचे भवितव्य खराब आहे. अजूनही कपाशीची झाडे मोसमात येताना दिसत नाही. थंडीचा जोरही नाही. याचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याचे चित्र दिसत आहे.