किन्हाेळा येथे वरली अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:54+5:302021-07-21T04:23:54+5:30

वाहतुकीस अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा चिखली : शहरातील सिद्धिविनायक चाैकात वाहतुकीस अडथळा निर्माण हाेईल, अशा पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या चालकाविरुद्ध ...

Raid on Worli base at Kinhaela | किन्हाेळा येथे वरली अड्ड्यावर धाड

किन्हाेळा येथे वरली अड्ड्यावर धाड

Next

वाहतुकीस अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा

चिखली : शहरातील सिद्धिविनायक चाैकात वाहतुकीस अडथळा निर्माण हाेईल, अशा पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या चालकाविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुभम लक्ष्मण भुतेकर (रा. मकरध्वज खंडाळा ता. चिखली) असे आराेपीचे नाव आहे. त्याने प्रवासी वाहन (क्र. एमएच ४६ - डब्ल्यू ६९४८) वाहतुकीस अडथळा निर्माण हाेईल असे उभे केले हाेते.

दारूची अवैध वाहतूक, एकावर कारवाई

चिखली : देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकावर चिखली पाेलिसांनी १९ जुलै राेजी कारवाई केली. कृष्णा भगवान राऊत असे आराेपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाेलिसांनी १४५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास चिखली पाेलीस करीत आहेत.

रुइखेड मायंबा येथे देशी दारू जप्त

धाड : पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रुइखेड मायंबा येथे दारूची विक्री करणाऱ्या विष्णू मोतीलाल वाघ याच्यावर पाेलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास पाेलीस करीत आहेत.

दारूची अवैध वाहतूक, एकावर कारवाई

धाड : धामणगाव ते धाड रस्त्याने दारूची वाहतूक करीत असलेल्या आराेपीकडून ४१ हजार ९३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. समाधान देवीदास सिरसाठ, संजय रूपचंद चव्हाण अशी आराेपींची नावे आहेत. पुढील तपास धाड पाेलीस करीत आहेत.

मारहाण करून रक्कम केली लंपास

धामणगाव बढे : काेल्ही गाेलेर येथील गणेश धनसिंग मोरे यांना कैलास मधुकर कांडेलकर याने मद्य प्राशन करून मारहाण केल्याची घटना १९ जुलै राेजी घडली. तसेच त्याच्याकडील माेबाइल, राेख १८०० असा ३८०० रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. या प्रकरणी आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साराेळा पीर येथे दारू जप्त

धामणगाव बढे : साराेळा पीर येथील अवैध दारू अड्ड्यावर पाेलिसांनी धाड टाकून ७५० रुपयांचा ऐवज जप्त केला तसेच आरोपी संजय रामचंद्र चव्हाण याच्यावर कारवाई केली. पुढील तपास धामणगाव बढे पाेलीस करीत आहेत.

उबाळखेड येथे ११०० रुपयांची दारू जप्त

धामणगाव बढे : उबाळखेड येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या अनिल सावळीराम जाधव (रा. गुळभेली) याच्यावर धामणगाव बढे पाेलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून एक हजार रुपयांची दारू व १०० रुपयांचा कॅन पाेलिसांनी जप्त केला. पुढील तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Raid on Worli base at Kinhaela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.