संग्रामपूर तालुक्यातील दोन जुगार अड्ड्यांवर धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 21:57 IST2019-03-28T21:57:37+5:302019-03-28T21:57:49+5:30

खामगाव: अप्पर पोलिस अधिक्षक पथकाची कारवाई

raid on gambling spots in Sangrampur taluka | संग्रामपूर तालुक्यातील दोन जुगार अड्ड्यांवर धाड

संग्रामपूर तालुक्यातील दोन जुगार अड्ड्यांवर धाड

खामगाव: संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलिस स्टेशनतंर्गत येत असलेल्या  दोन जुगार अड्डयांवर अप्पर पोलिस अधिक्षक पथकाने गुरूवारी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत सात जणांवर कारवाई करण्यात आली.
संग्रामपूर येथील राजनकर ले-आऊट भागात दोन ठिकाणी अवैध जुगार अड्डे सुरू असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे  पोलिसांनी धाड टाकली असता, शंकर गोविंदा धोटे, विजय रामभाऊ टाकणे, प्रकाश पुर्णाजी गव्हांदे रा. संग्रामपूर आणि भगवान फत्तू वाकोडे रा. तामगाव जुगार खेळताना आढळून आले. याप्रकरणी पो.ना. सुधाकर थोरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसºया घटनेत संजय दशरथ शेवतकर,  विनोद रामभाऊ ससाने, रमेश पांडुरंग जळमकार रा. झाशी हे तिघे जुगार खेळताना आढळून आले. याप्रकरणी पो.ना. श्रीकृष्ण नारखेडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही घटनांमधील सातही आरोपींवर कलम १२(अ) मजुका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: raid on gambling spots in Sangrampur taluka