भीषण अपघात! भाविकांची खासगी बस ट्रकवर आदळली; ४१ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:01 IST2025-04-18T16:00:48+5:302025-04-18T16:01:12+5:30

कडप्पा (आंध्रप्रदेश) येथील खासगी बस क्रमांक एपी-०७, सी-३६५५ अयोध्येहून नाशिककडे जात असताना काटी फाट्यानजीक ट्रक क्रमांक एमएच-१८, बीजी ६७३७ ला मागून जोरदार धडक दिली. अ

Private bus carrying devotees collides with truck; 41 passengers injured | भीषण अपघात! भाविकांची खासगी बस ट्रकवर आदळली; ४१ प्रवासी जखमी

भीषण अपघात! भाविकांची खासगी बस ट्रकवर आदळली; ४१ प्रवासी जखमी

मलकापूर (जि. बुलढाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर काटी फाट्यानजीक शुक्रवारी (१८ एप्रिल) पहाटे झालेल्या भीषण अपघातात देवदर्शनाहून परत येणारी खासगी बस थांबलेल्या ट्रकवर आदळल्याने ४१ प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कडप्पा (आंध्रप्रदेश) येथील खासगी बस क्रमांक एपी-०७, सी-३६५५ अयोध्येहून नाशिककडे जात असताना काटी फाट्यानजीक ट्रक क्रमांक एमएच-१८, बीजी ६७३७ ला मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका तीव्र होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली. मलकापूर ग्रामीण पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. ४१ जखमींपैकी १७ जणांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात तर आणखी १७ जणांना बुलढाणा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

जखमीपैकी बहुतांश रुग्ण आता धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्यांमध्ये प्रभावती रामजस जे (५०), विज्या विरमनाज रेड्डी (५०), लक्ष्मी नरसिम्हा (५५), कुडमया तलारी मुस्लाम (६०), सुलक्षणा पान्हा (६५), नागलु नगमा रामक्रिष्णा (४५), नारायण मधरेड (५६), लक्ष्मीदेवी रामा नायडु (५०), शेसोमा उडोकुमया (७०), नगम्मा रामक्रिष्णा (६५), गुंडमय्या रामलक्ष्मणा (७५), रामेश्वर कुणमया (७०), लक्ष्मीदेवी नारायणा (४५), लक्ष्मीदेवी शेषांद्री (५२), शेख शब्बीर अहेमद (३७), रामलक्ष्मणा गुंडमया (६५), व्यंकटरत्नम्मा दरंगेश्वरी रेड्डी (६०) सर्व रा. आंध्रप्रदेश आदींवर उपचार करण्यात आले. किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना परत पाठवण्यात आले.

बुलढाणा येथे उपचार सुरू

तर पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा शासकीय रूग्णालयात अपर्णा महादना (६०), रंगनाथ स्वामी नागाराज स्वामी (५०), प्रसाद रेड्डी कळबळ यल्ली (४८), गोिंवद अम्मा सर (६०), के.रामा स्वामी नागमन्ना (६७), पवन नम्मा व्यंकय्या (६५), पुष्पा रामंदु (६८), करपत अम्मा फत्तेसुरया (७५), रामायम्मा उमादेवी (५०), पद्मावती कुरया (५५), प्रेमीला येलया (३५), लिलावती छेले (५२), पार्वती चेनारेड्डी (६२), कारम्मा रामंडु (६८), नागलक्ष्मीमणा ईश्वर अय्या (६०), चिवरिया (६०), मंगम्मा आरावया (६५) यांना पाठवण्यात आले.

प्रशासनाची तत्काळ मदत

अपघातानंतर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे, पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांनी रुग्णालयात जाऊन मदतकार्य पाहिले. जखमी प्रवाशांच्या परतीच्या प्रवासाचीही व्यवस्था करण्यात आली.

Web Title: Private bus carrying devotees collides with truck; 41 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.