तुटलेल्या कठड्यांमुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:19+5:302021-07-12T04:22:19+5:30
येथील पातळगंगा नदीवरील पुलाचे कठडे तुटल्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, २२ ...

तुटलेल्या कठड्यांमुळे अपघाताची शक्यता
येथील पातळगंगा नदीवरील पुलाचे कठडे तुटल्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, २२ जूनच्या रात्री साडेअकराच्या सुमारास आयशर या वाहनाचे समोरील टायर फुटून हे वाहन कठडे तोडून पुलाखाली पडले होते. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. या आयशरमधील तीन युवकांचे जीव नागरिकांनी धाव घेऊन वाचविले. हे वाहन समृद्धी महामार्गावरील कंपनीचे हाेते.
एका बाजूचे कठडे तुटलेलेच
या अपघातामुळे पुलावरील एका बाजूचे कठडे तुटले आहेत. समोरील राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील पूलसुद्धा कमकुवत आहे. प्रशासनाने या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. पण जड वाहतूक सुरूच आहे. दोन्ही पुलांवरील कठड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.