शाळेत तोडफोड करणार्या तिघांविरूद्घ गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 20, 2014 22:31 IST2014-08-20T22:31:20+5:302014-08-20T22:31:20+5:30
शाळेत जावून तिघांनी शिक्षकांना शिवीगाळ व तोडफोड केल्याची घटना स्थानिक जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालयात आज २0 ऑगस्ट रोजी सकाळी घडली.

शाळेत तोडफोड करणार्या तिघांविरूद्घ गुन्हा दाखल
खामगाव : शाळेत जावून तिघांनी शिक्षकांना शिवीगाळ व तोडफोड केल्याची घटना स्थानिक जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालयात आज २0 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्राचार्य शिवाजी ठेंग यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिली की, लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन रुग्णवाहिकेवर चालक असलेला रमेश अवचार याने आज सकाळी ८.३0 वा. विद्यालयात येवून वर्गात शिकवित असलेल्या एका शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोर शिवीगाळ केली. त्याची समजूत काढून शिक्षकांनी त्याला परत पाठविले. मात्र ११.३0 वाजता पुन्हा दोघांना घेवून विद्यालयात येवून शिक्षक कक्षात उपस्थित शिक्षकांना शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तर समजाविण्यास पुढे आलेल्या एका श्क्षिकाला डेक्सची फळी तोडून मारण्यासाठी अंगावर धावून गेला. या आशयाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रमेश अवचारसह तिघांविरुध्द कलम ५0४, ५0६, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.