शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही तलाव, नैसर्गिक पाणवठे आटले!

By admin | Updated: April 13, 2017 01:05 IST

६४ जलस्रोत प्रभावित : सात वनपरिक्षेत्रातील जलस्तर घटला

बुलडाणा: जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात बारमाही तलाव व नैसर्गिक पाणवठे आहे. यातून वन्यजिवांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते; मात्र उन्हाळ्याच्या झळा सुरु होताच त्याचा फटका वनक्षेत्रास बसतो. परिणामी, सातही वनक्षेत्रातील बारमाही तलावातील जलस्तर घटला असून, नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. जिल्हास मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून, यात जवळपास ३५ प्रजातीचे पशुपक्षी वास्तव्य करतात. या वन्य प्राण्यांना वर्षभर पाणी पुरविण्याची जबाबदारी वन विभागाने स्वीकारली आहे. शिवाय वनक्षेत्रात असलेले तलाव व नैसर्गिक पाणवठे यांचाही या प्राण्यांना मोठा आधार असतो. गत पाच वर्षांपासून दुष्काळी छळ सोसत असलेल्या जिल्ह्यात पाणीटंचाईचा फटका वन्य प्राण्यांनाही बसतो.यंदा २०१६ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला खरा; मात्र नोव्हेंबरनंतर आजपर्यंत पावसाने जिल्ह्यात पाठ फिरविली. यामुळे नागरी क्षेत्रात पाणीपुरवठा करणारे धरण व तलावाने तळ गाठला आहे. शिवाय याचा मोठा परिणाम वनक्षेत्रातही आता पहायला मिळत आहे. गत तीन महिन्यांपासून वन्य प्राण्याची लोकवस्तीकडे पाणी व अन्नाच्या शोधात भटकंती सुरु झाल्यामुळे दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात घटत आहे.बुलडाणा जिल्हा सात वनपरिक्षेत्रात विभागला गेला असून, यातील ३२ बारमाही तलाव व ६४ नैसर्गिक पाठवठ्यामधून वन्य जिवांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते; मात्र उन्हाळ्याच्या झळा सुरु होताच त्याचा फटका वनक्षेत्रास बसतो. परिणामी, यंदा जळगाव जा. मोताळा, खामगाव, बुलडाणा, देऊळगावराजा, मेहकर व घाटबोरी वनक्षेत्रातील ६४ नैसर्गिक पाणवठे आटले आहेत.असे आहे वनक्षेत्रातील बारमाही तलावजळगाव जमोद परिक्षेत्रात कुंवरदेव, हनवतखेड, मोताळा परिक्षेत्रात पूर्व पलढग व नळगंगा, खामगाव परिक्षेत्रात हिवरखेड, लाखनवाडा, शिर्ला, पिंप्री, भोनगाव व जनुना, बुलडाणा परिक्षेत्रात पलढग, देऊळगावराजामध्ये दरेगाव, शिवणी टाका, गारखेड मेहकर परिक्षेत्रात धाड, टिटवी, गंधारी, भिवापूर, पिंपळनेर, जऊळका, चिखला, बिबखेड, कसारी तसेच घाटबोरीमध्ये मांडवा मन नदी, मोहन मन नदी वरवंड पाझरतलाव, उतावळी प्रकल्प व जनुना तलाव.