दिवाळीत बसस्थानकांत प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:17 IST2019-10-30T14:17:22+5:302019-10-30T14:17:29+5:30
मंगळवारी सकाळापासून खामगाव येथील एसटी स्थानकावर बहिणींची माहेरी जाण्यासाठी तर भाऊरायांची बहिणींना आणण्यासाठी एकच लगबग दिसून आली.

दिवाळीत बसस्थानकांत प्रवाशांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : दीपावली आणि पाडव्यानंतर सासुरवासीण बहिणींना माहेरची ओढ लागते. भाऊबीजेच्या सणाला मोठ्या प्रमाणात बहिणी माहेरी जातात. त्यामुळे एसटी स्थानकांवर प्रवाशांची अलोट गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सकाळापासून खामगाव येथील एसटी स्थानकावर बहिणींची माहेरी जाण्यासाठी तर भाऊरायांची बहिणींना आणण्यासाठी एकच लगबग दिसून आली.
रविवारी दीपावलीनंतर अनेक बहिणींनी सोमवारी सासरी पाडवा साजरा केला. त्यानंतर सोमवारी दुपारपासूनच बहिणींची माहेरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. मंगळवारी भाऊबीज असल्याने, सकाळपासूनच बस स्थानकावर मोठ्याप्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. यामध्ये बहिणी मोहरी जाण्यासाठी तर भाऊ आणि घरातील ज्येष्ठ मंडळी त्यांना आणण्यासाठी निघाले होते. बस स्थानकावर प्रवाशांच्या तुलनेत बसेसच्या अपुऱ्यासंख्येमुळे अनेकांची वाताहात झाल्याचे चित्र दिवसभर बसस्थानकावर होते.
एसटीला अतिरिक्त उत्पन्न!
दीपावलीच्या अतिरिक्त फेºया आणि हंगामी भाडेवाढीचा फायदा एसटी महामंडळाला होणार असल्याचे दिसते. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दहा ते १२ टक्के हंगामी भाडेवाढ एसटी महामंडळाकडून करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरी, लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागात अतिरिक्त बसफेऱ्यांचं नियोजन स्थानिक आगाराकडून करण्यात आले. परिणामी, एसटीच्या उत्पन्नात दीपावलीच्या दीवसात लक्षावधी रुपयांची भर पडणार आहे.