जुगार खेळणारा पाेलीस कर्मचारी निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:18 IST2021-05-31T18:18:13+5:302021-05-31T18:18:17+5:30
Buldhana News : पाेलीस अधीक्षकांनी चव्हाण यास निलंबीत केले आहे़.

जुगार खेळणारा पाेलीस कर्मचारी निलंबीत
बुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाेणार येथे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून ३२ जणांवर कारवाई केली़. या दरम्यान तेथे एक पाेलीस कर्मचारीही आढळला हाेता़ त्या कर्मचाऱ्यास पाेलीस अधीक्षकांनी निलंबीत केले आहे़.
लाेणार येथे जुगार सुरू असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांना मिळाली हाेती़. या माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते़. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ मे रोजी जुगारावर धाड टाकून ३२ जणांवर कारवाइ केली हाेती़. यात देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला रविराज केशव चव्हाण (३०) हा सुद्धा आढळला हाेता़. पाेलीस अधीक्षकांनी चव्हाण यास निलंबीत केले आहे़.