राष्ट्रीय पोषण महा अभियान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:41 IST2021-09-04T04:41:07+5:302021-09-04T04:41:07+5:30

अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे उपाध्यक्ष जयचंद भाटिया हे होते. प्रमुख अतिथी म्हणून एकात्मिक बाल विकास अधिकारी सोनुने, सुपरवायझर सुरेखा जाधव, ...

Organizing a program on the occasion of National Nutrition Campaign | राष्ट्रीय पोषण महा अभियान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय पोषण महा अभियान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे उपाध्यक्ष जयचंद भाटिया हे होते. प्रमुख अतिथी म्हणून एकात्मिक बाल विकास अधिकारी सोनुने, सुपरवायझर सुरेखा जाधव, नगर परिषदेचे नियोजन सभापती तोफिक कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निसार अन्सारी, रफिक कुरेशी, चाइल्ड लाईन अधिकारी नरेंद्र पवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा जाधव यांनी करून सप्टेंबर महिन्यात १ ते ३० सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण महा अभियान म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. नगरपरिषद उपाध्यक्ष जयचंद बाठिया यांनी अंगणवाडी सेविका या शासनाच्या विविध होत असलेल्या कामात एक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी नरेंद्र पवार, निसार अन्सारी, तोफिक कुरेशी, सोनवणे आदींनी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान असल्याचे यावेळी सांगितले. संचालन अंगणवाडी सेविका रंजना सपकाळे यांनी तर, आभार आयशा प्रवीण यांनी मानले. यावेळी शहरातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Organizing a program on the occasion of National Nutrition Campaign