शिजवलेल्या अन्नाचाच मेन्यूकार्डमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:26 PM2020-10-11T12:26:14+5:302020-10-11T12:26:39+5:30

Mission Begin Again, Restaurants. Buldhana शिवजलेल्या  खाद्यपदार्थाचाच समावेश मेनुकार्डमध्ये करण्यात यावा, अशा सुचना दिल्या आहेत.

Only cooked food is included in the menu card | शिजवलेल्या अन्नाचाच मेन्यूकार्डमध्ये समावेश

शिजवलेल्या अन्नाचाच मेन्यूकार्डमध्ये समावेश

googlenewsNext

बुलडाणा: मिशन बिगीन अगेन अतंर्गत बुलडाणा जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेने उपहारगृहासह बार सुरू झाले असले तरी ग्राहकांना शक्यतो डिजीटल मेन्यूकार्ड उपलब्ध करण्यासोबतच शिवजलेल्या  खाद्यपदार्थाचाच समावेश मेनुकार्डमध्ये करण्यात यावा, अशा सुचना नऊ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी एका आदेशानुसार दिल्या आहेत. विशेष म्हणजे थंड पदार्थांचा मेन्यूकार्डमध्ये समावेश नसावा, असेही अनुषंगीक आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे उपहारगृह, बार, रेस्टॉंरंट व तत्सम आस्थापनाची नियमीत तपासणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस प्रशासन आणि अन्न प्रशासनास दिले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी उपहारगृह, रेस्टॉरंट आणि बारमध्ये होते की नाही, याची पाहणी या तीनही यंत्रणांना आता करावी लागणार आहे.
दरम्यान, यासंदर्भातील नियमावली ही अत्यंत बारकाईने करण्यात आली असून उपहारगृहामध्ये कापडी रुमाला ऐवजी डिस्पोजेबल कागदी रुमाल वापरण्यासोबतच दोन टेबलमध्ये एक मिटरपेक्षा कमी अंतर नसावे तथा अशा आस्थापनामध्ये सीसीटीव्ही कायम कार्यान्वीत ठेवण्यात यावे असेची सुचीत करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांचे गणवेशही ही दररोज इस्त्री किंवा स्टीम प्रेसच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण केले जावे अशा सुचनाही दिल्या गेल्या आहेत. यासोबतच उपहारगृहातील कर्मचाºयांना डिसपोजल फेस मास्क, ग्लोज, हेअर नेट आणि अन्य सुरक्षा साधनांचा काम करताना वापर करावा लागणार आहे. व्हेज पदार्थ अंदाजे ५० पीपीएम क्लोरीन सॅनिटाईजींग करण्यासाठी वापरण्याच्या सुचना आहे

Web Title: Only cooked food is included in the menu card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.