शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

‘जिगाव’प्रकल्पासाठी गरजेच्या तुलनेत ४१ टक्केच निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:53 AM

Jigaon Dam : यंदा अवघ्या ६९० कोटी रुपयांची तरतूद केल्या गेली आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  पश्चिम वऱ्हाडाचा सिंचन अनुशेष भरू काढण्याची ताकद असलेल्या जिगाव प्रकल्पावर चालू आर्थिक वर्षात ६८८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला असला तरी हा प्रकल्प २०२५ च्या कालमर्यादेत पुर्णत्वात नेण्यासाठी दरवर्षी किमान १ हजार ९३० कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. मात्र त्या तुलनेत यंदा अवघ्या ६९० कोटी रुपयांची तरतूद केल्या गेली आहे. जी की एकूण गरजेच्या तुलनेत अवघी ४१ टक्के आहे.विदर्भाचा सिंचन अनुशेष आणि त्यातल्या त्यात बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष पाहता राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मुलनाच्या निधी वाटपाच्या सुत्राच्या बाहेर जाऊन जिगाव प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे. मात्र त्याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सुमारे १ लाख १० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाला कालमर्यादेत पुर्णत्वास नेण्यासाठी सलग तिसऱ्यांचा खासदार असलेले प्रतापराव जाधव आणि राज्याचे अन्न व अैाषध प्रसासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जोरकस प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.दुसरीकडे २०१९-२० या आर्थिक वर्षातील केंद्र सरकारकडून हवा असलेला ६६ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी जलसंपदा विभागास या वर्षी प्राप्त झाला असला तरी जिगाव प्रकल्प व पुनर्वसन व भुसंपादनाच्या कामावर झालेल्या ६८८ कोटी ५० लाख रुपयांच्या झालेल्या खर्चाच्या तुलनेत केंद् सरकारचा १७२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अद्याप अप्राप्त आहे. त्यानुषंगाने १७२ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जून महिन्यात पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाकडून निधी त्वरेने उपलब्ध होणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प