शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यात पाणीटंचाईचा दरवर्षी एक बळी

By admin | Updated: May 25, 2017 19:37 IST

नियोजनाअभावी पाणीटंचाईचे भयानक चित्र

उद्धव फंगाळलोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उन्हाळ्यामध्ये दरवर्षी मेहकर तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई निर्माण होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी संबंधीत विभागाकडून पाणीटंचाईचा कृती आराखडा दरवर्षी तयार करण्यात येतो. परंतु तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रत्यक्षात कामे होतांना दिसत नाही. नियोजनाअभावी मेहकर तालुक्यात पाणीटंचाईचे भयानक चित्र निर्माण होत आहे.तीव्र पाणीटंचाईमुळे मेहकर तालुक्यात दरवर्षी १ बळी जात आहे. मात्र संबंधीत विभागाकडून पाणीटंचाईचा प्रयत्न गंभीरतेने घेतल्या जात नाही. मेहकर तालुक्यात जवळपास १४० गाव येतात. त्यापैकी जवळपास ८० ते ८५ गावात पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येतो. या कृती आराखड्याला मंजुरात मिळाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी सुरु होते. परंतु प्रत्यक्षात पाणी टंचाईचे नियोजन बरोबर नसल्याने अनेक गावामध्ये पाणीटंचाईचे भयानक चित्र निर्माण होत आहे. तर मागील वर्षी पाणीटंचाईमुळे एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर यावर्षी सुद्धा एका महिलेला पाण्यामुळेच आपला जीव गमवावा लागला. अशा बिकट परिस्थितीत संबंधीत विभागाचे अधिकारी ज्या गावात घटना घडली त्या गावात जाऊन केवळ औपचारिकता पूर्ण करुन कागदोपत्री पाणीटंचाई निवारण्याचा अहवाल तयार करुन वरिष्ठांना पाठवितात. तर वरिष्ठ अधिकारी सुद्धा कागदावरचा अहवाल पाहून घडत असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. अधिकाऱ्यांच्या या कागदी घोड्यांमध्ये मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब जनता भरडल्या जात आहे. पाणीटंचाईवर मेहकर तालुक्यात दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. पाणीटंचाईसाठी शासन लाखो रुपये देत असतांना पाणीटंचाई निर्माण होते कशी, लाखो रुपये जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांच्या या वेळकाढू धोरणामुळे मात्र गरीबांचे दरवर्षी हाल होत आहेत. पाणीटंचाईचे दोन वर्षात दोन बळीमेहकर तालुक्यात दरवर्षी तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई निर्माण होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन उपाययोजना करण्यात येतात. मात्र स्थानिक विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे पाणीटंचाईचे भयानक चित्र तयार होत आहे. तर याच पाणीटंचाईमुळे २०१६ मध्ये दादुलगव्हाण येथील महेश देवानंद शेजुळ या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पाणी भरताना विहिरीत पडून मृत्यू झाला होता. तर यावर्षी २०१७ मध्ये पार्डी येथील सावित्री सहदेव होगे या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे सतत दोन वर्षात पाणीटंचाईमुळे दोन जणांना आपला जीवन गमवावा लागला आहे.कायम पाणीटंचाई निवारण योजना गायबगेल्या काही वर्षापासून मेहकर तालुक्यात पाणीटंचाईची समस्या वाढतच आहे. त्यामुळे काही गावातील पाणी समस्या कायमची दूर करण्यासाठी अनेक गावामध्ये महाजल, जलस्वराज राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांवर शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केला आहे. परंतु ज्या-ज्या गावात ही योजना राबविण्यात आली त्या गावाची पाणी समस्या आजरोजी कायमच आहे. निकृष्ट व अर्धवट कामामुळे या योजनांचा बट्टयाबोळ झाला आहे. त्यामुळे या योजनांची कामे करणारे ठेकेदार व संबंधीत अधिकारी यांची चौकशी करुन कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.५९ गावात तीव्र पाणीटंचाईमेहकर तालुक्यात ५९ गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, ४९ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. तर ८ गावामध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. पाणी टंचाईचे भयानक चित्र तालुक्यात पहायला मिळत असून, नियोजनाअभावी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.