शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

वहिनीवर अत्याचार करणाऱ्या दिरास सात वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 12:05 PM

Crime News चुलत वहिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका नराधमास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चुलत वहिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका नराधमास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. याप्रकरणी १० साक्षीदार तपासण्यात आले. खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.संग्रामपूर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय विवाहिता ६ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तान्हुल्या बाळाला दूध पाजत होती. त्यावेळी दुसरा मुलगा तिच्या जवळच होता. दरम्यान,  घरी कुणी नसल्याची संधी साधत, नात्याने चुलत दीर असलेल्या नराधमाने तिच्या खोलीत प्रवेश केला.  तोंड दाबून, पाठीवर आणि तोंडावर मारहाण करीत जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी आरोपी शे. शाहेद नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर, जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे  यांनी आरोपीस कलम ३७६ मध्ये सात वर्षांची शिक्षा सुनावली. तर, कलम ३२३ आणि ५०६ मध्ये प्रत्येकी एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्व शिक्षा आरोपीस एकाचवेळी भोगावयाची असून दीड वर्षांपासून तो कारागृहात होता. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेश्वरी अजय आळशी यांनी काम पाहिले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी