राजूर घाटात  मालवाहू वाहन, दुचाकी अपघातात तेल्हाऱ्यातील युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:46 PM2020-11-09T12:46:41+5:302020-11-09T12:55:12+5:30

भूषण मुरलीधर कुटे (वय २५, रा. तेल्हारा) हा जागीच ठार झाला.

One killed in a two-wheeler accident in Rajur Ghat | राजूर घाटात  मालवाहू वाहन, दुचाकी अपघातात तेल्हाऱ्यातील युवक ठार

राजूर घाटात  मालवाहू वाहन, दुचाकी अपघातात तेल्हाऱ्यातील युवक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देघाटातील वळणावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले.दुचाकी व मालवाहू वाहन दोन्ही ट्रकखाली आले.

मोताळा: मालवाहू वाहन व दुचाकी अपघातात एक ठार, तीन गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्रीदरम्यान घडली. हा अपघातबुलडाणा मलकापूर रोडवरील राजूर घाटात घडली.
मध्यप्रदेशातील एका व्यापाऱ्याने बुलडाण्यातून खरेदी केलेली सरकी घेऊन रात्री १२ वाजेच्या सुमारास ट्रक (क्र. एमपी १४ एसी ११५५) राजूर घाटात पोहोचला. घाटातील वळणावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. याचवेळी समोरून एका दुचाकीवर (क्र. एमएच २८ बीजे ३५९४) दोन युवक बुलडाण्याकडे जात होते आणि त्यांच्या मागे एक मालवाहू वाहन (क्र. एमएच २८ एच ८५२०) होती. ट्रक पलटी होत असताना दुचाकी व मालवाहू वाहन दोन्ही ट्रकखाली आले. त्यामध्ये दुचाकीस्वार भूषण मुरलीधर कुटे (वय २५, रा. तेल्हारा) हा जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला अजय आवरकर (३०, रा. संभाजी नगर, बुलडाणा) हा गंभीर जखमी झाला.

Web Title: One killed in a two-wheeler accident in Rajur Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.