ट्रक-जीपच्या धडकेत एक ठार; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:50 IST2018-03-16T01:50:15+5:302018-03-16T01:50:15+5:30

दुसरबीड(बुलडाणा) : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या तढेगाव फाट्यानजीक ट्रक आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी पहाटे घडली.

One killed in truck crash Two serious | ट्रक-जीपच्या धडकेत एक ठार; दोन गंभीर

ट्रक-जीपच्या धडकेत एक ठार; दोन गंभीर

ठळक मुद्देजोरदार धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
दुसरबीड(बुलडाणा) : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या तढेगाव फाट्यानजीक ट्रक आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी पहाटे घडली.
जालन्याकडून यवतमाळकडे जाणारी जीप (एमएच- २९ -एआर-४००५) आणि भरधाव वेगात जालन्याकडे जाणारा ट्रक (एएच-१६-एवाय-५५०९) यांची जोरदार धडक झाली. यामध्ये जीपमधील  शशिकांत ब्रिजलाल शर्मा (४५), विष्णू शर्मा (३०), चालक अभिजित राठोड (३० (सर्व रा. शर्मा ले-आउट, किरण पेट्रोल पप यवतमाळ) हे गभीर जखमी झाले. त्यांना जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता शशिकांत शर्मा यांचा मृत्यू झाला,  तर अन्य दोघांवर उपचार करण्यात येत आहे. किनगावराजा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास बिट जमादार अशोक मांटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल जाकेर पठाण हे करीत आहेत. 
 

Web Title: One killed in truck crash Two serious