दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:51 IST2021-11-17T18:51:26+5:302021-11-17T18:51:43+5:30
Malkapur News : अपघातात डोक्यावर मार बसल्याने देविदास दांदळे जागीच ठार झाले.

दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
मलकापूरः दुचाकी अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील विटाळी - धानोरा दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
देविदास जगदेव दांदळे (वय ६६) व मारोती गुणाजी भोलवणकर (वय ६२) दोघेही रा.शिरसोडी ता.नांदुरा हे मलकापूर येथून काकड आरतीचे सामान घेवुन क्र.एम. एच.२८/बि.जी.८२८० क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे येत होते. विटाळी - धानोरा दरम्यान वळणरस्त्यावर विरूद्ध दिशेने भरघाव वेगात आलेल्या एम.एच.२८/ए.टी.७०२० क्रमांकाच्या दुचाकीने जबर धडक दिली. त्यात झालेल्या अपघातात डोक्यावर मार बसल्याने देविदास दांदळे जागीच ठार झाले. तर खांद्यावर व पाठीवर मार लागल्याने मारोती भोलवणकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच शिरसोडी गांवातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात देखील नागरिकांनी गर्दी केली. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे करित आहेत.