वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी; सोनबर्डी येथील घटना

By विवेक चांदुरकर | Updated: July 20, 2023 22:01 IST2023-07-20T22:00:44+5:302023-07-20T22:01:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील सोनबर्डी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना ...

One killed, one injured by lightning; Incident at Sonberdi | वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी; सोनबर्डी येथील घटना

वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी; सोनबर्डी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील सोनबर्डी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली.
सोनबर्डी येथील धरणाजवळ राहणारे दोघे तरुण धरणावर पाणी पाहायला गेले असता वीज पडल्याने ज्ञानेश्वर भारत यादव (२१) या तरुणाचा मृत्यू झाला.

त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र आकाश तुकाराम जांभुळकर (२३) जखमी झाला आहे. मृतकाचे वडील भारत यादव धरणावर गेले असता त्यांना दोघेही जमिनीवर पडलेले दिसले. त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने दोघांनाही जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी ज्ञानेश्वर भारत यादव याला मृत घोषित केले. जखमी आकाश जांभूळकर याच्यावर जामोद येथे उपचार सुरू आहे. जळगाव जामोद पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक रंजना आवारे व पोलिस शिपाई रंजित व्यवहारे, स्वप्निल झुंझारकर, समाधान शिंगणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Web Title: One killed, one injured by lightning; Incident at Sonberdi

टॅग्स :Rainपाऊस