शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

मालवाहू वाहन उलटून झालेल्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 3:31 PM

मेहकर शहरातील रेणुका चौक परिसरातील चढावर उलटून झालेल्या अपघातामध्ये तोफिक मोहम्मद चौधरी (रा. गवळीपुरा, मेहकर) हा युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

 मेहकर :  लग्न मंडपाचे लोखंडी साहित्य घेऊन जाणारा  मालवाहू वाहन मेहकर शहरातील रेणुका चौक परिसरातील चढावर उलटून झालेल्या अपघातामध्ये तोफिक मोहम्मद चौधरी (रा. गवळीपुरा, मेहकर) हा युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तोफिकचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.मेहकर शहरात शनिवारी पालिकेच्या एका शाळेती कार्यक्रमासाठी मंडपाचे साहित्य आणण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रविवारी हे साहित्य  मालवाहू वाहनअ‍ॅपेद्वारे परत नेण्यात येत होते. दरम्यान  हे साहित्य नेत असताना मेहकरातील तोफिक मोहम्मद चौधरी हा युवक अ‍ॅपेमध्ये सामानाच्या सुरक्षेसाठी बसला होता. दरम्यान,  अ‍ॅपे स्थानिक सावजी गल्लीतील रेणुका चौकातील चढावर आला असता अ‍ॅपे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलने हा अ‍ॅपे अचानक उलटला. त्यामध्ये तौफिक अ‍ॅटोतून खाली पडला. सोबतच त्याच्या अंगावर अ‍ॅडोतील लोखंडी साहित्य व पाईप पडले. त्यात तोफिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला त्वरेने मेहकरातीलखासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचारादरम्यान तौफिक मोहम्मद चौधरीची प्राणज्योत मालवली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. रेणुका चौक अपघात प्रवण स्थळमेहकर शहरातील रेणुका चौक परिसर अपघात प्रवण स्थळ बनू पाहत आहे. या ठिकाणी या पूर्वीही वाहनांचे चार ते पाच अपघात झालेले आहेत. त्यामुळे हा रस्ता पालिकेने योग्य पद्धतीने करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाMehkarमेहकर