शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात एक ठार, दोन जण जखमी

By admin | Updated: October 25, 2015 01:10 IST

शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दसरा सणानिमित्ताचे खासगी काम आटोपून दुचाकीने गोपाल चिंतामन उमरेडकर (५५) व गणेश लहानूजी बारापात्रे (४५)...

अहेरी, इंदाराम येथील घटना : नागपूरला नेताना एकाचा मृत्यूशुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दसरा सणानिमित्ताचे खासगी काम आटोपून दुचाकीने गोपाल चिंतामन उमरेडकर (५५) व गणेश लहानूजी बारापात्रे (४५) दोघेही रा. नागपूर हे अहेरीकडून नागपूरकडे जात होते. दरम्यान अहेरी-चंद्रपूर मार्गावर मुतापूर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले. या दोन्ही जखमींना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. दुसरा अपघात शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अहेरी-इंदाराम मार्गावर घडला. राकेश आत्राम (२९) रा. इंदाराम हा युवक आपल्या दुचाकीने अहेरीकडे जात होता. दरम्यान व्यंकटरावपेठा गावाजवळ ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. यात राकेश गंभीर जखमी झाला. गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. राकेशच्या पार्थीवावर शनिवारी इंदाराम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.गेल्या तीन-चार महिन्यांत अहेरी तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक मार्गाची दुरवस्था झाल्याने रात्रीच्या सुमारास अहेरी-आलापल्ली मार्गावर अपघात घडत आहेत. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांनी केली जखमींची विचारपूसदसरा सणानिमित्त नागपूरवरून आलेल्या गोपाल चिंतामन उमरेडकर (५५) व गणेश लहानूजी बारापात्रे (४५) रा. नागपूर हे मुतापूर फाट्याजवळ घडलेल्या अपघातात जखमी झाले. या दोन्ही जखमींना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यासाठी पालकमंत्र्यांनी वाहनाची व्यवस्था केली. यावेळी त्यांच्यासोबत कुमार अवधेशरावबाबा व प्रविणरावबाबा व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.