अकोला-खामगाव  रस्त्यावर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:54 IST2021-07-14T11:54:41+5:302021-07-14T11:54:49+5:30

One killed in Akola-Khamgaon road accident : भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने ४६ वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाला.

One killed in Akola-Khamgaon road accident | अकोला-खामगाव  रस्त्यावर अपघातात एक ठार

अकोला-खामगाव  रस्त्यावर अपघातात एक ठार


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने ४६ वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी  रात्री उशिरा अकोला-खामगाव  रस्त्यावर घडली.  
खामगाव तालुक्यातील नागापूर येथील नारायण ज्ञानदेव तिव्हाने हे १२ जुलै रोजी शेतीचे साहित्य घेण्यासाठी दुचाकीने खामगाव येथे आले होते. काम आटोपून रात्रीच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एमएच २८ - यू २८४८) परत जात होते. 
दरम्यान, रात्री अकोला-खामगाव रस्त्यावर त्यांच्या वाहनाला एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यात  नारायण तिव्हाने यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रामेश्वर तिव्हाने यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One killed in Akola-Khamgaon road accident