अकोला-खामगाव महामार्गावर अपघातात एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 11:57 IST2021-07-18T11:56:52+5:302021-07-18T11:57:00+5:30

One killed in accident on Akola-Khamgaon highway : भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.

One killed in accident on Akola-Khamgaon highway | अकोला-खामगाव महामार्गावर अपघातात एक जण ठार

अकोला-खामगाव महामार्गावर अपघातात एक जण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजता अकोला-खामगाव महामार्गावरील तरोडा कसबानजीक घडली.
शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विजय सुनील गवळी (१८) आणि एका खासगी कंपनीचे अभियंता मनिषसिंह कुमार हे दोघे एमएच २७ सीके १८९९ या क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. 
दरम्यान, विरुद्ध दिशेने येत असलेल्या एमएच ०४ जीआर ७४११ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवित दुचाकीला जबर धडक दिली.
यात  विजय गवळी हा युवक जागीच ठार झाला, तर मनिषसिंह कुमार गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, या प्रकरणी तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात भरधाव वेगाने ट्रक चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत तर एकास जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One killed in accident on Akola-Khamgaon highway