शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

एक किलो मिठाची थैली १३ हजार ५११, तर १०० ग्रॅम हळद ३ हजार ७०० रुपयांना

By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 29, 2023 18:47 IST

एक किलो मिठाची थैली १३ हजार ५११ रुपये, तर १०० ग्रॅम हळद ३ हजार ७०० रुपयांना विक्री झाली आहे.

नायगांव दत्तापूर : ऐकून नवल वाटेल, पण एक किलो मिठाची थैली १३ हजार ५११ रुपये, तर १०० ग्रॅम हळद ३ हजार ७०० रुपयांना विक्री झाली आहे. गणेश उत्सवाला झालेल्या भंडाऱ्यातील उरलेल्या धान्याची हर्राशी करण्याची ही परंपरा मेहकर तालुक्यात नायगाव दत्तापूर येथील मंदिरात जपली जात आहे.                        

येथील हनुमान मंदिर मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला एक महिना पोथी पारायण सुरू असते. त्याचठिकाणी गणेशाची स्थापना व विसर्जनावेळी अमृत योग म्हणुन सर्व गावकऱ्यांतुन गहु, तांदुळ, तूर दाळ आणि वर्गणी जमा करत संपूर्ण गावाचा १० क्विंटलचा भंडारा येथे होतो. हीच परंपरा यंदाही जपण्यात आली आहे. १७१ वर्षाची परंपरा आजही जोपासत पोथी पारायणाची सांगता टाळ व मृदंगाच्या गजरात करण्यात आली. संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. २८ सप्टेंबर रोजी १० क्विंटलचा भंडारा सर्व गावकऱ्यांच्या सहभातून पार पडला. त्यानंतर २९ सप्टेंंबरला उरलेल्या धान्याची सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हर्राशी पार पडली. मंदिराचे भंडाऱ्यातील उरलेले धान्य बाजार भावापेक्षा दहा पटीने जास्त दरात विकत घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये चढा-ओढ होताना पाहावयास मिळत आहे. एकुण ८५ हजार ३३३ रुपयांची धान्य व किराणा साहित्याची भाविकांनी मोठ्या आनंदाने खरेदी केली.

धान्य घेण्यासाठी अशी लागली बोलीभास्कर दशरथ निकम यांनी सात किलो तुर दाळ २३ हजार २५० रुपये, विठ्ठल भिकाजी निकम एक किलो मिठ १३ हजार ५११, सज्जन दहातोंडे यांनी १०० ग्रॅम हळद ३ हजार ७००, सुनील निकम पावडर १०० ग्राम २५००, गजानन निकम गहु आटा २० किलो १० हजार, आटा गणेश शेळके ३४८०, प्रत्येकी ५० किलो गहु भारत निंबेकर ३०००, शिवाजी नालेगांवकर २५५०,नामदेव खाडे २०००, तुकाराम साळूंके १९००,धोंडु शेळके १६५०, सुधाकर शेळके १६५०, सुरेश शेळके २१०, मिठ थैली १ किलो डॉ.समाधान निकम ३७००, शिवाजी शेळके ३५००, साडी सुधाकर निकम ५६५६, साडी ईश्वर प्रल्हाद निकम २५२५, तांदूळ विजय चिपडे ४०० आणि सर्व धान्याची खाली पडलेली झाड-झुड ५०० ग्राम पुरुषोत्तम भाकडे १५१ रूपयात खरेदी केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा