मोताळा तालुक्यात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:46 IST2018-01-25T00:46:15+5:302018-01-25T00:46:57+5:30
पिंप्रीगवळी : मोताळा तालुक्यातील माकोटी फाट्यानजीक एका वळणवार दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना २४ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता घडली.

मोताळा तालुक्यात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंप्रीगवळी : मोताळा तालुक्यातील माकोटी फाट्यानजीक एका वळणवार दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना २४ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता घडली.
विलास शेजोळ (वय ४२) असे अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बोदवडजवळ असलेल्या येवती-रेवती येथील ते रहिवाशी होते. नातेवाइकाच्या भेटीसाठी ते दुचाकीद्वारे माकोडी येथे आले होते. येवती येथे परतीच्या मार्गावर असताना माकोडी फाट्यावर असलेल्या एका वळणावर त्यांच्या एमएच-१९-एसी-५५0८ या क्रमांकाची दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडले. त्यातच त्यांचे अपघाती निधन झाले. या घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल राणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर येथे पाठविला.