विद्युत तार अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 19:26 IST2021-06-06T19:25:44+5:302021-06-06T19:26:14+5:30
One dies after electric wire falls on him : ५० वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता हरणखेड शिवारात घडली.

विद्युत तार अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
मलकापूर : बैलजोडीसह शेतात सरी टाकण्याचे काम करीत असताना प्रवाहित विजेची तार अंगावर पडून एका ५० वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता हरणखेड शिवारात घडली.
मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील शेतमजूर रमेश श्रावण तायडे हे शेतमालक मोतीलाल सोनटक्के यांच्या हरणखेड शिवार तालुका बोदवड गट नंबर २१५ येथे शेतात सरी टाकण्याचे काम बैलजोडीसह करत होते. दुपारी ३ वाजता दरम्यान अचानक महावितरण कंपनीची विद्युत तार तुटली. शेतमजुराच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, गावातील राजू नेवे, जीवनसिंह राजपूतसह गावकरी व पोलीस, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हजर झाले. अपघात हा महावितरणच्या चुकीमुळे झाल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नगराध्यक्ष रावळ,काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी यांनी आमदार राजेश एकडे व शासनाकडे केली आहे.