विहिरीचे खोदकाम करताना दरड कोसळली; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 11:02 IST2019-01-27T10:53:11+5:302019-01-27T11:02:22+5:30
विहिरीचे खोदकाम करताना दरड कोसळल्याने अंगावर दगड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

विहिरीचे खोदकाम करताना दरड कोसळली; एकाचा मृत्यू
मलकापूर - विहिरीचे खोदकाम करताना दरड कोसळल्याने अंगावर दगड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. नांदुरा तालुक्यातील मौजे विटाळी शिवारात रविवारी (27 जानेवारी ) सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष महीपत दामधर (32) व अमोल दशरथ वेलदोडे (23) हे दोघे नांदुरा तालुक्यातील मौजे विटाळी शिवारात समाधान क्षीरसागर यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम करत होते. रविवारी खोदकाम करत असतानाच अचानक दरड कोसळली. त्यामध्ये संतोष दामधर याचा जागीच मृत्यू झाला तर डोक्यावर गंभीर मार बसल्याने अमोल वेलदोडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावरउपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मलकापूर परिसरात एक नव्हे तर अशा अनेक घटना मागील काळात घडल्या आहेत. प्रत्येक वेळी माहिती दिल्यानंतर देखील पोलीस हजर राहत नाही. अशी अनास्था असल्याने पोलिसांचे वेतन वाढवा व हफ्ते वाढवा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी दिली आहे.