साडेचार लाखांच्या प्लॉट फसवणूक प्रकरणी एकास अटक
By अनिल गवई | Updated: November 15, 2023 16:20 IST2023-11-15T16:20:13+5:302023-11-15T16:20:44+5:30
दोन आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

साडेचार लाखांच्या प्लॉट फसवणूक प्रकरणी एकास अटक
खामगाव: शेगाव येथील साडेचार लाख प्लॉट फसवणूक प्रकरणातील तिघांपैकी एका आरोपीस बुधवारी पहाटे शेगाव पोलिसांनी अटक केली. घाटपुरी नाक्यावरून पहाटे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
याप्रकरणी शेख अजीज शेख साबीर आझादनगर, आळसना रोड, शेगाव यांच्या तक्रारीवरून लक्ष्मण विश्वनाथ वराडे रा. घाटपुरी नाका, खामागव, पंकज सीताराम घोरपडे (रा. गजानन कॉलनी, खामगाव), नसीर खान दुलेखा (रा. आळसना) या तिघांिवरोधात भादंवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, बुधवारी पहाटे लक्ष्मण विश्वनाथ वराडे याला पोउपनि राहुल कातकाडे यांनी शहर पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात अटक केली.