शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयाबाहेर भरते दुसरे कार्यालय

By admin | Updated: June 2, 2015 02:26 IST

अधिकारी बदलताच भीती संपली ; बुलडाण्याच्या आरटीओ कार्यालयात दलालांचा मुक्त वावर.

बुलडाणा : महेश झगडे या सनदी अधिकार्‍याने बुलडाण्यापासून मुंबईपर्यंतच्या तमाम आरटीओ कार्यालयांना गेली काही महिने प्रचंड शिस्त लावली होती. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही म्हणणारी जनता कोणत्याही एजंटाची मदत न घेता नियमानुसार पैसे देऊन आपले काम करून आणत होते; मात्र शासनाने झगडे यांची बदली केली आणि आरटीओतील दहशतच संपली. पर्यायाने आरटीओ कार्यालयांमध्ये पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आरटीओ कार्यालयात दलालांची मक्तेदारी वाढत असून, त्यांच्याकडून विविध कामे घेऊन येणार्‍या वाहनधारकांची आर्थिक लूट होत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व महत्त्वाची कामे परिसरात दलालामार्फत होत असल्यामुळे कार्यालयाबाहेर दुसरे कार्यालय भरत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागात वाढता दलालांचा वावर लक्षात घेऊन परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयात दलालांना प्रतिबंध घालण्याचा फतवाच काढला होता; मात्र या आदेशामुळे बेरोजगारांचे नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून या आदेशाच्या विरोधात अकोला ट्रक ओनर्स असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मार्च २0१५ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश काढून दलालांवरील प्रतिबंध आदेशावर निकाल दिला. यानुसार अधिकृत दलालांनाच आरटीओ कार्यालयांमध्ये काम करू देण्यास मान्यता दिली. यानंतरही शहरातील आरटीओ कार्यालयात पुन्हा सर्वच दलाल सक्रिय झाले आहे. त्यामुळे परिवहन विभागापुढे दलालमुक्तीचे आवाहन पुन्हा उभे ठाकले आहे. वाहन परवाना, नवीन गाडीचे रजिस्ट्रेशन, रिक्षा टॅक्सीचे परमिट आदींसह अन्य कामे थेट आरटीओच्या कार्यालयात कर्मचार्‍यांच्या माध्यमातून काम करायचे झाले तर त्याला अनेक फाटे फुटतात. दोन दिवसांत होणार्‍या कामाला किती दिवस लागतील, हे कोणीही सांगू शकत नाही; मात्र दलालांच्या माध्यमातून एखादे काम करायचे झाल्यास हे ठरल्या वेळेवर होते. आरटीओ कार्यालयात दलालांची मक्तेदारी वाढली आहे. या दलालांनी काही कर्मचार्‍यांच्या मदतीने परिवहन कार्यालयाबाहेर झाडाखाली, मुख्य प्रवेशद्वाराजवळ, भिंतीच्या आडोशाला कोपर्‍यात आपले स्वतंत्र्य कार्यालयच थाटल्याचे नजरेस पडते. कामाला आलेल्या नागरिकांना कार्यालयाबाहेर हेरले जाते. कोणतेही काम तत्काळ करून देण्याचे आमिष देऊन नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. आरटीओ कार्यालयात येणार्‍या नागरिकांची कामे त्वरित करा, त्यांना मार्गदर्शन करा, सूचनाचे माहिती फलक लावा, अशा सूचना देण्यात आल्या आहे. शिवाय परिवहन आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी कार्यालयात सुरू असून, एजंटांना कार्यालय परिसराबाहेर काम करण्याच्या सूचना आहे. शिवाय यासाठी जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित आहे. या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरटीओ कार्यालयात येणार्‍या नागरिकांची कामे त्वरित करा, त्यांना मार्गदर्शन करा, सूचनाचे माहिती फलक लावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगीतले. शिवाय परिवहन आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी कार्यालयात सुरू असून, एजंटांना कार्यालय परिसराबाहेर काम करण्याच्या सूचना आहे. शिवाय यासाठी जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.