शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमाशाळेत आता विषयनिहाय शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:57 IST

आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे भरण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्यूत्तर पदवीधारक शिक्षक मिळणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आदिवासी विकास विभागांतर्गत १ हजार ५८ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात, त्यात २७ शाळा ह्या पश्चिम वºहाडात आहे. या शाळांवर एकाच विषयातील पदव्युत्तर पदवी असताना उच्च माध्यमिकच्या एका शिक्षकाला विज्ञान शाखेचे दोन विषय शिकवावे लागत होते. परंतू आता राज्यातील आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे भरण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्यूत्तर पदवीधारक शिक्षक मिळणार आहे; याचा पश्चिम वºहाडातील १२ शाळांना फायदा होणार आहे.राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत ५०२ शासकीय व ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांपैकी १२१ शासकीय आश्रमशाळा व १५४ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिकच्या ११ वी व १२ वी कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यात येत आहेत. आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिक स्तरावर विज्ञानशाखेला प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, व गणित असे विषय असून या शाखेसाठी तीन पदे मंजूर आहेत. एकाच विषयातील पदव्युत्तर पदवी असताना उच्च माध्यमिकच्या एका शिक्षकाला विज्ञान शाखेचे दोन विषय शिकवावे लागत होते.त्यामुळे त्यांच्यावरील कार्यभार अधिक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत होता. याचा विचार करून सुधारित आश्रमशाळा संहितेनुसार आकृतिबंधामध्ये सुधारणा करून विज्ञान शाखेसाठी चार शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक उपलब्ध होणार आहेत.आश्रमशाळेत अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेत शिकविणाऱ्या २५ हजाराहुन अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी आदिवासी विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळांपैकी १० शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि ११ अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ देऊन इयत्ता अकरावी व बारावीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यास मान्यता देण्यात आली होती. या आश्रमशाळा वगळून उर्वरित सर्व शासकीय व अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान विषयाच्या शिक्षकाचे एक अतिरिक्त पद मंजूर करण्यास आदिवासी विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकांवर येणारा कार्यभार हलका होणार आहे.

आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी अतिरिक्त विज्ञान शिक्षक पदास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने नुकतेच पत्रही प्राप्त झाले आहेत. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील १० ते १२ शाळांवर विज्ञान शाखेसाठी अतिरिक्त शिक्षकांची तरतूद आहे.- आर. बी. हिवाळे,प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाTeacherशिक्षक