शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

अपक्षांसह सात छोट्या पक्षांवर ‘नोटा’ पडले भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 6:01 PM

बुलडाणा: निवडणूक रिंगणातील उमेदवारापैकी एकाचीही मतदाराला निवड करायची नसले आणि मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्यही जर मतदाराला बजावयाचे आहे, अशा स्थितीत ‘नोटा’ अर्थात ‘नन आॅफ द अबोव्ह’ हा पर्याय गेल्या सहा वर्षापूर्वी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे.

- नीलेश जोशीबुलडाणा: निवडणूक रिंगणातील उमेदवारापैकी एकाचीही मतदाराला निवड करायची नसले आणि मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्यही जर मतदाराला बजावयाचे आहे, अशा स्थितीत ‘नोटा’ अर्थात ‘नन आॅफ द अबोव्ह’ हा पर्याय गेल्या सहा वर्षापूर्वी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान १६ व्या लोकसभा निवडणुकीत बुलडाणा लोकसभा मतदार संघात तब्बल दहा हजार ५४६ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडल्याचे स्पष्ट झाले आहे.परिणामी गेल्या वेळी अर्थात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ सहा अपक्ष आणि सात छोट्या पक्षांवर भारी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांपैकी १.७ टक्के मतदारांनी नोटाचा वापर केल्याची गेल्या वेळची आकडेवारी सांगते. त्यामुळे १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्येही प्रसंगी ‘नोटा’चा प्रभाव वाढण्याची भीती राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. काही संघटना आणि अलिकडेच वेगळ््या विदर्भाच्या मुद्द्यावर विदर्भ निर्माण महामंच व स्वभापच्या एका माजी आमदारानेही जिल्ह्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध असल्याचा उल्लेख केला होता. २७ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ईव्हीएममध्ये ‘नोटा’ बटनाचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दिल्ली, मध्य प्रदेश व छत्तीसगडसह काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा सर्वप्रथम वापरही झाल्याचा इतिहास आहे. त्यानंतर २०१४ मधील १६ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये व पुढील विधानसभा निवणुकीत ‘नोटा’चा वापर झाला आहे.

१.७ टक्के मतदारांची ‘नोटा’ला पसंती२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बुलडाणा लोकसभा मतदार संघात अशोक राऊत, कृष्णराव इंगळे, गंगाराम चिंचोले, नामदेव डोंगदरदिवे, संजय वानखडे, दिनकर संबारे या सहा अपक्षांसह परमेश्वर गवई, प्रभाताई पार्लेवार, अ‍ॅड. रविंद्र भोजने, रविंद्रसिंग पवार, वसंतराव दांडगे, सुधीर बबन सुर्वे, संदेश आंबेडकर या छोट्या मोठ्या पक्षांच्या तिकीटावर उभ्या राहलेल्या उमेदवारांवर ‘नोटा’ भारी पडलेले आहे. ‘नोटा’च्या १०,५४६ या संख्येच्या आसपासही हे उमेदवार पोहोचू शकले नव्हते.

नोटा’ची केवळ नोंदसध्या नोटाची केवळ नोंद होते. त्याचा विजेत्या उमेदवारावर तसा काही परिणाम होत नाही. त्यामुळे ‘नोटा’ची गरज, सुधारणा व त्याची व्याप्ती या तीन मुद्द्यावर साकल्याने विचार होणे गरजेचे आहे. पाश्चात्य राष्ट्रात काही ठिकाणी प्रसंगी विजेत्या उमेदवाराला कॉल बॅक ही करण्यापर्यंतचे अधिकार ‘नोटा’ किंवा नकारात्मक अधिकारामुळे मिळालेले आहे. स्विझरलंडचे त्या बाबतीत उदाहरण देता येईल, असे एका जाणकाराने सांगितले. दरम्यान, स्पेन, इंडोनेशिया, कॅनडासह काही ठिकाणी याबाबत प्रयोग झालेले आहेत. अगदी पाकिस्तानमध्येही २०१३ मध्ये ‘नोटा’चा समावेश केला गेला होता. मात्र नंतर तो पाकिस्तान निवडणूक आयोगाने रद्द ठरवल्याचे संदर्भ विकीपिडीयावर उपलब्ध  आहेत.

रजतनगरीक सर्वाधिक पसंतीलोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ असलेल्या खामगाव अर्थात रजतनगरी समाविष्ठ असलेल्या विधानसभेमध्ये दोन हजार १३९ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली होती. अन्य सहा विधानसभांच्या तुलनेत येथे ‘नोटा’ला सर्वाधिक मतदारांनी निवडले होते.

विधानसभा निहाय ‘नोटा’ला पडलेली मतेविधानसभा        नोटाबुलडाणा        १७१८चिखली        १७४३सिंदखेड राजा        १५४३मेहकर            १७४३खामगाव        २१३९जळगाव जामोद        १६६०

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019