शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

राष्ट्रवादीचा बुलडाण्याच्या जागेवर दावा कायम; शरद पवारांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:47 IST

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या पक्षांतर्गत बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुलडाणा लोकसभेच्या जिल्ह्यातील एकंदर स्थितीबाबत कोअर कमिटीमधील सदस्यांकडून बुलडाणा लोकसभेचा सविस्तर आढावा घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे

ठळक मुद्देया प्रक्रियेमुळे बुलडाणा लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेने दावा कायम ठेवला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या या बैठकीमध्ये तब्बल चार तास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींच्या पृष्ठभूमीवर चर्चा झाली.

- निलेश जोशी

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या पक्षांतर्गत बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुलडाणा लोकसभेच्या जिल्ह्यातील एकंदर स्थितीबाबत कोअर कमिटीमधील सदस्यांकडून बुलडाणा लोकसभेचा सविस्तर आढावा घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, या प्रक्रियेमुळे बुलडाणा लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेने दावा कायम ठेवला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याशी संपर्क साधला असता त्याने ही या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील अकोला व बुलडाणा लोकसभा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आदलाबदल करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा लगाम लागला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या या बैठकीमध्ये तब्बल चार तास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींच्या पृष्ठभूमीवर चर्चा झाली. त्यामध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघासंदर्भात १५ ते २० मिनीट चर्चा होऊन शरद पवार यांनी स्वत: सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका या प्रसंगी एप्रिल-फेब्रुवारी महिन्यातच होण्याची शक्यता पाहता अनुषंगीक बाबींची पक्षाची चाचपणीही करण्यात येऊन लोकसभा व विधानसभा एकत्र होण्याची शक्यताही या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने तपासून पाहली असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.काँग्रेसही बुलडाणा लोकसभा मतदार संघ लढविण्यासाठी इच्छूक आहे. त्यामुळे मतदार संघ बदलासंदर्भातील चर्चा पुढील टप्प्यात काय वळण घेते, हे येणारा काळच ठरवणार आहे. मुंबईतील बैठकीत सध्याच्या सत्ताधार्यांना रोखण्यासाठी विखुरलेले पक्ष एकत्रीत आणून आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. सोबच काँग्रेसला ५०-५० जागा देण्याबाबतच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. मात्र आघाडीत भारिपला स्थान देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नकारात्मक असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार