शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

मलकापूरजवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची मिनी डोरसह पोलीस व्हॅनला धडक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:57 AM

मलकापूर: भरधाव ट्रकने आधी मालवाहू मिनी ट्रक त्यानंतर मलकापूर एमआयडीसी पोलीस व्हॅनला जबरदस्त धडक दिल्याने दोघे ठार तर पाच जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वर रसोया प्रोटिन्स कंपनीजवळ मंगळवारी दुपारी १.३0 वाजता घडली.  

ठळक मुद्देखड्डय़ामुळे अपघात मलकापूरमधील दोघे ठार; पाच गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: भरधाव ट्रकने आधी मालवाहू मिनी ट्रक त्यानंतर मलकापूर एमआयडीसी पोलीस व्हॅनला जबरदस्त धडक दिल्याने दोघे ठार तर पाच जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वर रसोया प्रोटिन्स कंपनीजवळ मंगळवारी दुपारी १.३0 वाजता घडली.  या अपघातामध्ये ठार झालेल्यात सय्यद अन्वर वझीर (३८, रा. पारपेठ) आणि  नशीर खा बशीर खा (३२, रा. हाश्मीनगर) यांचा समावेश आहे.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून मुंबईवरून नागपूरकडे भरधाव जाणारा ट्रकच्या (क्र. डब्ल्यूबी २३-डी१७५५)  चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आधी रसेया प्रोटिन्सनजीक दीड वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणार्‍या मालवाहू मिनी ट्रकला जबर धडक दिली. तर काही अंतरावरच  एमआयडीसी पोलीस व्हॅनला (क्र.एमएच२८-सी६४५८) धडक दिली. अपघातात ट्रकसहित व्हॅनदेखील उलटली. या अपघातात गंभीर जखमींपैकी सैय्यद अन्वर वझीर (वय ३८, रा. पारपेठ मलकापूर) याचा उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये रहेमानभाई कुरेशी (वय ५५ रा. पारपेठ) यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. पोलीस व्हॅन चालक सुरेशसिंह राजपूत (वय ५२), सैय्यद गफुर सय्यद अयाज (वय २५), शे. सईद शे. हसन (वय ३२), रईसखान युसुफखान (वय ३0) यांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांवर कोलते तर दोघांवर चोपडे हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. गंभीररीत्या जखमी नशिरखा बशीरखा (वय ३२, रा.हाश्मीनगर मलकापूर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले असता दुपारी ४.३0 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरनजीक त्यांची प्राणज्योत मालवली. अन्वरखा रसिदखा (वय ३0) यांचीसुद्धा प्रकृती गंभिर आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र वाडेकर यांनी तत्काळ मदत वाहन बोलावून घेतले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. महामार्गावरील खड्डय़ांमुळे होणार्‍या अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 

उपचारासाठी नेतानाच एकाचा मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात गंभीररीत्या जखमी नशिरखा बशीरखा (वय ३२) रा. हाश्मी नगर मलकापूर यांना खासगीत उपचार घेत असताना प्रकृती अत्यावस्थ झाल्याने जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले; मात्र वाटेतच दुपारी ४.३0 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरनजीक त्यांची प्राणज्योत मालवली. तर जखमीत अन्वरखा रसिदखा (वय ३0) यांची भर पडली आहे. 

पुन्हा एकदा खड्डे चर्चेतराष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रिया थंड बस्त्यात आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पुन्हा एकदा खड्डय़ांमुळे अपघात घडला आहे. आणखी किती बळी घेणार, हा सवाल घटनास्थळी उपस्थित झाला आहे.

टॅग्स :malkapur bypassमलकापूर बायपासbuldhanaबुलडाणाAccidentअपघात