शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

नांदुरा : दोन गटातील हाणामारी; ५0 जणांविरुद्ध गुन्हा; १२ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:33 AM

नांदुरा : अवैध रेती उपसा करणार्‍या रेती माफियांनी प्रातर्विधीस गेलेल्या तरुणीला हटकल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तब्बल पन्नास आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. त्यापैकी १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, गुरुवारी आरोपींना नांदुरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपींना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, नांदुरा शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

ठळक मुद्देपरस्परविरोधी तक्रारीवरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : अवैध रेती उपसा करणार्‍या रेती माफियांनी प्रातर्विधीस गेलेल्या तरुणीला हटकल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तब्बल पन्नास आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. त्यापैकी १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, गुरुवारी आरोपींना नांदुरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपींना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, नांदुरा शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.याबाबत पवन दिनकर अवचार (वय १८) रा. जळगाव जामोद ह.मु.पंचवटी याने नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, तो मित्रांसोबत पंचवटी परिसरात क्रिकेट खेळत असताना शेजारील एका तरुणीने अवैध रेती माफिया रेतीचा उपसा करीत असताना हटकत असल्याचे सांगितले. याबाबत फिर्यादी व त्याचे मित्र त्या रेती माफियांना विचारणा करण्यासाठी गेले असता ते निघून गेले; मात्र काही वेळानंतर अंदाजे ३0 ते ४0 मुले कुरेशी मोहल्याकडून हातात काठी व इतर साहित्य घेऊन आले व त्यांनी शिवीगाळ करून लोखंडी पाइपने फिर्यादीला मारहाण केली व त्यानंतर या जमावाने पंचवटी भागात हैदोस घालीत महिलांना मारहाण केली व दुचाकी वाहने, किराणा दुकान व घरांचे नुकसान केले. या तक्रारीवरून २९ आरोपींविरुद्ध पोलिसांनी विविध गंभीर कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. यापैकी शे.जाकीर शे.हाशम, शे.साजीद शे.कालू, शे.सईद स.शेख आसीम, शे.रिजवान शे.तस्लीन, शे.शाहीद ऊर्फ सल्लू, शे.चांद कुरेशी, शे.मोहसीन शे.कालू सर्व रा. कुरेशी मोहल्ला तसेच मो.वसीम शे.निसार व जाकीर खान आसीफ खान रा.पंचवटी अशा आठ आरोपींना अटक केली आहे. शे.शहीद शे.कुरेशी रा.कुरेशी मोहल्ला याने तक्रार दिली, की तो मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याकरिता गेला असताना राजू मगर व इतर २0 जणांनी काठय़ा व लोखंडी पाइपने मारहाण केली. यापैकी राजू मगर, मनीष राखोंडे, अमोल डहाके व श्रीकृष्ण तेलकर या चौघांना पोलिसांनी अटक केली. सर्व २१ आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ जानेवारीपर्यंत न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सध्या शहरात तगडा पोलीस बंदोबस्त असून, तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचे धरपकड सत्र सुरू आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा