शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथे कोट्यवधी रुपयांचा तूर खरेदी घोटाळा!

By admin | Updated: May 7, 2017 02:21 IST

कृउबास संचालकांची तक्रार;संचालक आणि व्यापा-यांचे धाबे दणाणले

नांदुरा (जि. बुलडाणा) : तूर खरेदीच्या टोकन व विक्री रजिष्टरमध्ये घोळ करुन संचालक व व्यापारी यांनी संगमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची तक्रार खरेदी विक्री संघ व कृउबासचे संचालक मनोहर देशमुख(रा.सोनज) यांनी ५ मे रोजी जिल्हाउपनिबंधक यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे. यामुळे संचालक आणि व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहे.नांदुरा येथील कृउबासच्या बाजार खरेदी विक्री व बाजार समिती संचालक मनोहर देशमुख यांनी टोकन व विक्री रजिष्टरमध्ये शेतकर्‍यांच्या नावासमोर त्यांच्या क्षेत्रफळाच्या जागेत क्षेत्रफळ न लिहता ह्यएम.टी.एमह्ण अशी नोंद असून अनेकांच्या नावासमोर रिकाम्या जागा सोडल्या आहेत. त्याच बरोबर यादीतील काही शेतकर्‍यांच्या नावावरील क्षेत्रफळाच्या नोंदी तक्रारकर्त्यांंनी तपासल्या असता धक्कादायक प्रकार समोर आला. (प्रतिनिधी)मोठय़ा प्रमाणात अफरातफर!फक्त बारा गुंठेएवढय़ा क्षेत्रफळाची नोंद असलेल्या शेतकर्‍यांच्या नावावर तब्बल नव्वद क्विंटल तुरीची विक्री झाले आहे. या यादीत शंभरपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या नावावर शेकडो क्विंटल तुरीची विक्री दाखविली असून, अत्यल्प क्षेत्रफळात एवढी तूर त्यांनी कशी पिकवली हा प्रश्न शेष आहे. बहुतांश शेतकर्‍यांची तूर आज रोजी घरात पडून असताना संचालक व व्यापारी यांनी शेतकर्‍यांची हजारो क्विंटल तुरीची विक्री एफएसआयला करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.रजिष्टर मधल्या नोंदीत गौंडबंगालखरेदी विक्री संघाने जे रजिष्टर नोंदीसाठी केले आहे. त्यामध्ये काही नावांसमारे एमटीएम अशी नोंद आहे. हा ह्यकोड वर्डह्ण कोणाचा आहे? तसेच पाच ते सात शेतकर्‍यांच्या नावासमोर एकसारख्या एकाच व्यक्तीच्या स्वाक्षर्‍या आहेत. तर काही नावे जिल्हा बाहेरीरची असून काहींच्या नावावर काही गुंठे क्षेत्रफळ असताना त्यांच्या नावावर साठ ते नव्वद क्विंटल तुरीची विक्री दाखवली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.