दगडाने ठेचून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:33 IST2017-10-25T00:29:27+5:302017-10-25T00:33:35+5:30

जामोद: दगडाने ठेचून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना  मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास  घडली. 

The murdered wife murdered by a stone | दगडाने ठेचून पत्नीची हत्या

दगडाने ठेचून पत्नीची हत्या

ठळक मुद्देपती दुर्गा पावरा  ितला परत नेण्यासाठी कुंवरदेव येथे आला होतामेंढामारी शिवारात तिची दगडाने ठेचून हत्या केलीआरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
जामोद: दगडाने ठेचून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना  मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास  घडली. 
अंबोडा (झिन्सी) ता. रावेर, जि. जळगाव येथील रुणाबाई दुर्गा  पावरा (वय ३५ वर्ष) ही महिला पती त्रास देत असल्याने माहेरी  कुंवरदेव येथे आलेली होती. दरम्यान, तिचा पती दुर्गा पावरा  ितला परत नेण्यासाठी कुंवरदेव येथे आला होता. सोमवारी  रुणाबाई, तिचा पती व माहेरील सर्व मंडळी जामोद येथील विजय  पारवे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान, दु पारी दुर्गा पारवा याने घरून फोन आला असून, शेतातील ज्वारी  काढायची असल्याने लगेच जायचे आहे असे म्हणून शे तमालकाकडून २00 रुपये घेऊन पत्नी रुणाबाईला घेऊन  घराकडे निघाला; मात्र वाटेतच त्याने मेंढामारी शिवारात तिची  दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ  खुमसिंग हजारी बारेला  यांनी  पोलीस स्टेशनला तक्रार दिली.  यावरून पोलिसांनी तपास करून आरोपी दुर्गा गणपत पावरा  (४0) रा. अंबोडा (झिन्सी) ता. रावेर, जि. जळगाव  याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२, ४९८ ‘अ’ नुसार गुन्हा दाखल  केला आहे.  

Web Title: The murdered wife murdered by a stone

टॅग्स :Crimeगुन्हा