मूल होत नाही म्हणून विवाहितेला जिवे मारले पाच जणांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:44 PM2020-05-02T13:44:59+5:302020-05-02T13:55:43+5:30

मूल होत नाही म्हणून विवाहितेला जिवे मारल्याची घटना मालकापुरात घदली.

Murder of a married woman for not having a child, crime against five, arrest of four | मूल होत नाही म्हणून विवाहितेला जिवे मारले पाच जणांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक

मूल होत नाही म्हणून विवाहितेला जिवे मारले पाच जणांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक

Next

मलकापूर: मुलबाळ होत नाही म्हणून सासरच्या मंडळीनी विवाहितेला गळा आवळून जिवे मारल्याची घटना येथील मोहनपुरा भागात शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीर अहमद अ.बशीर यांच्या सायमा कौसर या मुलीचा विवाह मोहनपुऱ्यातील शे.मोहम्मद शे.यूसूफ याच्याशी झाला होता. सायमा कौसर हिला मूलबाळ होत नाही. या कारणामुळे तिचा बऱ्याच दिवसापासून शारिरिक व मानसिक छळ सुरु होता. यामुळे ती खुप त्रस्त होती. याबाबत तिने अनेकदा सांगितले सुद्धा होते. मात्र दिवस उलटले की सर्व काही ठिक होईल अशी आशा माहेरच्यांना होती. मात्र तिचा त्रास वाढतच गेला. अखेर २९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सासरच्या मंडळीने सायमा कौसर हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार जमीर अहमद शेख बशीर.यांनी शहर पोलीसात दिली.

पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून मृतक सायरा कौसर चे पती शे.मोहम्मद शे.यूसूफ, सासू जुलेखाबी शे.युसुफ, दिर शे.अमीन शे.युसुफ, दिराणी जमिलाबी शे.अमीन,मामसासरे शे.हमीद शे.अहमद अशा पाच जणांविरुद्ध शुक्रवारी कलम ३०२,४९८ अ,३२३,३४ अन्वये भा.द.वी.चा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी उशिरा रात्री  विवाहीतेचा पती, सासू, दीर, दिराणी अशा चार जणांना अटक करून गजाआड केले आहे. तर पाचवा आरोपी मामसासरा शे.हमीद शे.अहमद हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे यांनी दिली आहे. या घटनेमुळे  मोहनपुऱ्यात एकच खळबळ उडाली असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Murder of a married woman for not having a child, crime against five, arrest of four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.