ठाकरे गटात उरलेले १४ आमदारही रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 15:11 IST2022-11-10T13:59:15+5:302022-11-10T15:11:05+5:30

खासदार प्रतापराव जाधव यांच्या या विधानाची चर्चा आता रंगू लागली आहे.

MP Prataprao Jadhav has claimed that the remaining 14 MLAs in the Thackeray group also meet the Chief Minister at night. | ठाकरे गटात उरलेले १४ आमदारही रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

ठाकरे गटात उरलेले १४ आमदारही रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

बुलढाणा- बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील झालेले खासदार प्रतापराव जाधव यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उरलेले १४ आमदारही प्रचंड अस्वस्थ असून रात्री ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना येऊन भेटतात असं म्हणत खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील उर्वरित आमदारही प्रचंड अस्वस्थ असून काही वैयक्तिक कारणामुळे ते शिवसेनेत थांबून आहेत. त्यांची ही अस्वस्थता केव्हा संपेल हे सांगता येणार नाही, असं म्हणत सर्वच्या सर्व आमदार रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना येऊन भेटतात, असं विधान करत खासदार प्रतापराव जाधव यांनी एक मोठी खळबळ माजवून दिली आहे. त्यामुळे पुढील काळात उर्वरित ठाकरे गटाकडील आमदारही शिंदे गटात सामील होतात की काय?, अशी चर्चा या विधानामुळे रंगू लागली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

Web Title: MP Prataprao Jadhav has claimed that the remaining 14 MLAs in the Thackeray group also meet the Chief Minister at night.