जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून आंदोलन
By Admin | Updated: June 9, 2017 01:07 IST2017-06-09T01:07:20+5:302017-06-09T01:07:20+5:30
कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून आंदोलन
बुलडाणा : शेतकर्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी, यासाठी ८ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष राणा चंदन यांनी जिल्हाधिकारी यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून अनोखे आंदोलन केले. यावेळी राणा चंदन यांनी घोषणा देऊन शेतकर्यांचा सातबारा कोरा करा, ह्यस्वामिनाथनह्णच्या शिफारशी लागू करा, अशा घोषणा यावेळी प्रवेशद्वारावर चढून करण्यात आल्या. प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा बंदोबस्त ठेवूनसुद्धा स्वाभिमानीचे कार्यकर्ते मुख्य प्रवेशद्वारावर चढून आंदोलन यशस्वी केले. मागण्या मान्य न झाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरावर चढू, असा इशारा राणा चंदन यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने राणा चंदन व कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन अटक केली व काही तासांनी सुटका करण्यात आली. यावेळी या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते.
गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकर्यांनी संप पुकारुन संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. शेतकर्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकर्यांनी रान उठवले आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून शेतकर्यांची एकच मागणी आहे, सात-बारा कोरा करुन सरकारने शेतकर्यांना न्याय द्यावा; परंतु सरकारने काही दिवसांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामुळे सरकारने शेतकर्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.